देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 13 जानेवारी : अहिल्यानगर शहरातील महानगर पालिका निवडणुक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आज सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार संपणार आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार ) आरपीआय (आठवले ) महायुतीच्या प्रचार रॅलीस आज शहरात द ग्रेट खली आलेले असतांना, माळीवाडा भागातून महायुतीच्या सर्व उमेदवारांची प्रचार रॅली शहरातून निघाली.
प्रभाग क्रमांक 13 मधून महायुतीचे प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या रॅलीमध्ये गोर गरीब नागरिकांच्या समस्या जाणणारा आपल्यातला भाऊ म्हणजे सुरेश भाऊ बनसोडे अशा चर्चा रॅलीत प्रभागातील नागरिकांमधून चर्चा ऐकायला मिळत होत्या.