देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 12 जानेवारी: अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम भैय्या जगताप, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत.
प्रभाग क्रमांक 13 मधून महायुतीचे प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
उमेदवार सुरेश बनसोडे प्रसार माध्यमाशी बोलतांना म्हणाले, आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उभारलेला पूर्णाकृती पुतळा, मंजूर करण्यात आलेले भव्य संविधान भवन, व प्रभाग 13 चा सर्वांगीण विकास हाच माझा जाहीरनामा असून आमदार जगताप यांच्या माध्यमातून शहरात भव्य असा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणार आहे, प्रभागातील पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, स्वछता, व आदी मूलभूत मुद्यावर आम्ही काम करणार असून प्रभागातील मतदार आमच्या चारही उमेदवारांना घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा