राजकिय
शहराची हवा ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने – द ग्रेट खली एन्ट्रीने भाजपा राष्ट्रवादीच्या प्रचारात रंगत !


रॅलीदरम्यान द ग्रेट खली यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या साध्या आणि प्रेरणादायी शब्दांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारांच्या जोरावर शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“शहराच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका असून विकासासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामातून सकारात्मक बदल दिसून येतो, म्हणूनच आज या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
युतीचे प्रभाग 13 मधील उमेदवार सुरेश बनसोडे यांच्या सह सर्वच प्रभागातील उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.