देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :मुंबई दिनांक 7 डिसेंबर ~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील जातीभेद मिटविण्यासाठी आंतरजातीय विवाह एक महत्त्वाचा उपाय असल्याचे सांगितले आहे. संविधानाने जातीभेद कायद्याने संपविला असला तरी समाजात जातीभेद होत आहे.संविधांच लागू होऊन 75 वर्षे लोटली तरी अजूनही जातीभेदातून ऑनररकिलिंग
च्या घटना घडत आहेत.नांदेड च्या इतवारी भागात सक्षम ताटे या कोवळ्या दलित तरुणाची जातीभेदातून झालेली
निर्घुण हत्या हा ऑनर किलिंग चा प्रकार आहे.या अमानुष हत्याकांडाचा आपण तीव्र. निषेध करीत असून सक्षम ताटे या दलित तरुणाच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
देशभरात जातुभेदातून दलित तरुणांच्या ऑनर किलिंगमुळे हत्या झाल्याची प्रकार वाढले आहेत. ऑनर किलिंग रोखण्यासाठी नवीन कठोर कायदा केला पाहिजे. ऑनर किलिंग मधील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद करून ऑनर किलिंग च्या घटनांना आळा घातला पाहिजे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा