अभिनव अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त निलक्रांती चौक येथे हजारो मेणबत्त्या पेटवून अनोखे अभिवादन!

देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दिनांक 7 डिसेंबर : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत करण्यात येतो.
आंबेडकरी चळवळीतील केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या नीलक्रांती चौक येथे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच विविध भागातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर हे अभिवादन करत होते. सायंकाळी सात वाजता येथील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रभागातील महिला व हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत बुद्ध वंदना घेत हजारो मेणबत्या पेटवून एका अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. या भागातील शिव, फुले, शाहू,आंबेडकर, साठे चळवळीतील माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हे अनोखे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ज्या महामानवाने मानवाने कोटी कुळांचा उद्धार करत बहुजन समाजाच्या अंधारमय जीवनात प्रकाश टाकला. या उदात्त सामाजिक हेतूने प्रेरित होऊन हजारो मेणबत्ती पेटवून एक अभिनव व अनोखे अभिवादन करण्यात आले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रभाग क्रमांक नऊ गौतमनगर परिसरातील महेश भोसले, दयानंद साळवे, अरविंद साळवे, गणेश साळवे, सतीश साळवे, विक्रम शिंदे, सिंधुबाई सूर्यवंशी, शीलाताई वाघचौरे, छायाताई संभागळे, अनुराधाताई साळवे, संगीता शिंदे, संगीता भैलुमे,कोमल साळवे, शितल भालेराव, सुषमा साळवे, शीला कांबळे, संगीता मिसाळ, सविता कांबळे, राणी जाधव, शारदा पटेकर, माधुरी सोरटे,रेखा सोरटे, तेजस्वी साळवे, विमल पाचरणे, मंगलाताई साळवे, रिटाताई साळवे, प्रतिभा साळवे,रेखा मकासरे, हर्षा गायकवाड, विमल सोरटे, अस्मिता शिंदे,अंबिका साळवे, विधी साळवे, शुभम जाधव, राहुल साळवे, शुभम जाधव, महेर मिसाळ, अक्षय वाघचौरे, गौरव वाघचौरे, तुषार बोराडे,प्रबुद्ध कांबळे,किरण पवार, तेजस पाचारणे, साहिल शेख सोहेल सय्यद, विकास साळवे, प्रवीण भिंगारदिवे, अनिकेत साळवे, क्रिश साळवे, अमित घाटविसावे, रुपेश भोसले, भारत ठोंबे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे