देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 16 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी पार पडली.
अहिल्यानगर प्रभाग 13 प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर लढविली. राष्ट्रवादी पार्टी (अजित ) पवार गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले, विजयी उमेदवार नगरसेवक सुरेश बनसोडे देशस्तंभ न्यूजशी बोलतांना म्हणाले माझ्या विजयात आमदार संग्राम भैय्या जगताप, निवडणुकीत दिवसरात्र झटणारे, कार्यकर्ते, व प्रभागातील मतदार नागरिक यांचा मोठा वाटा असून प्रभागातील विकास हेच माझे ध्येय आहे.प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदार व नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा