देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 12 फेब्रुवारी: प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, टोळी प्रमुख (1) फैजान जब्बार कुरेशी (शेख), वय 25 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला,ममदापुर,ता.राहाता,जि. अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) मुन्तजीर मुनिर कुरेशी, वय 23 वर्षे, रा.सदर (3) अब्दुलकरीम अमिर कुरेशी, वय 52 वर्षे, रा.सदर (4) मुनिर अमिर कुरेशी, वय 56 वर्षे, रा.सदर, (5) जब्बार हसन कुरेशी (शेख), वय 23 वर्षे, रा.सदर, (6) नाजीम आयुब कुरेशी, वय 33 वर्षे, रा.सदर (7) वसीम आयुब कुरेशी, वय 27 वर्षे, रा.सदर (8) रिजवान महेबुब कुरेशी, वय 25 वर्षे, रा.सदर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी राहाता तालुक्यातील ममदापुर व लोणी परिसरात सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता गैर कायदयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागविणे, गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसची वाहतुक करणे व इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात आणणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती.
टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन 2021 ते 2025 मध्ये सराईतपणे केले असुन त्यांचे विरुध्द प्रतिबंध कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता तसेच लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द श्री.कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव आमच्या कार्यालयात सादर केला होता.
सदर प्रस्तावाची श्री.अमोल भारती, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग,जि. अहिल्यानगर यांनी चौकशी करुन शिफारशीसह चौकशी अहवाल सादर केला.
सदर प्रस्तावाची आम्ही सखोल चौकशी करुन टोळीप्रमुख (1) फैजान जब्बार कुरेशी (शेख), वय 25 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला,ममदापुर,ता.राहाता,जि. अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) मुन्तजीर मुनिर कुरेशी, वय 23 वर्षे, रा.सदर (3) अब्दुलकरीम अमिर कुरेशी, वय 52 वर्षे, रा.सदर (4) मुनिर अमिर कुरेशी, वय 56 वर्षे, रा.सदर, (5) जब्बार हसन कुरेशी (शेख), वय 23 वर्षे, रा.सदर, (6) नाजीम आयुब कुरेशी, वय 33 वर्षे, रा.सदर (7) वसीम आयुब कुरेशी, वय 27 वर्षे, रा.सदर (8) रिजवान महेबुब कुरेशी, वय 25 वर्षे, रा.सदर यांना हद्दपार करणे आवश्यक वाटत असल्याने त्यांना अहिल्यानगर जिल्हयातुन 18 महिन्यांकरीता हद्यपार केले बाबतचे आदेश पारीत केलेले आहेत.
अहिल्यानगर जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील शरीराविरुध्दचे, मालाविरुध्दचे, गोवंशीय कायदयान्वये गुन्हे करणारे, भारतीय हत्यार कायदयान्वये तसेच वाळु चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार इसमांच्या टोळीची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार टोळीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असुन त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा