देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : दि. 2 फेब्रुवारी : आरपीआय (आठवले ) गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव तथा माजी नगरसेवक अजय साळवे यांचे चुलत बंधू निलक्रांती चौक येथील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील तरुण कार्यकर्ते सचिन साळवे (वय 40 ) यांचे काल दि. 1 फेब्रुवारी रोजी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा नातेवाईक,मित्र, कार्यकर्ते असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने अहिल्या नगर शहरातील आंबेडकरी चळवळी त व निलक्रांती चौक परिसरातील नातेवाईक कार्यकर्ते यांच्या मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सतत हसतमुख असण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांची अंत्ययात्रा गौतमनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून त्यांचा अंत्यविधी आज दि. 2 फेब्रुवारी रोजी नालेगाव येथील अमरधाम येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या वतीने व देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा