देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 31 जानेवारी : अहिल्यानगर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराचे विकास कामातून बदललेले रूप म्हणजेच स्वर्गीय अजित दादा होय, असे मत आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
या वेळी उपस्थित होते आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राजेंद्र गुंड, संजय कोळगे, गटनेते प्रकाश भागानगरे, महापौर भगवान फुलसोदर, नगरसेवक कुमार सिंह वाकळे, अविनाश घुले, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार, संजय चोपडा, राजेंद्र गुंड, संजय कोळगे, सुरेश बनसोडे, अजिंक्य बोरकर, महेश तवले, डॉ. सागर बोरुडे, सुनील काळे, विपुल शेटीया, विजय गव्हाळे, मयूर बांगरे, केशव नागरगोजे, जालिंदर कोतकर, महेंद्र कांबळे, सुमित लोंढे, जितू गंभीर, गोरख पडोळे, संग्राम रासकर, जय भोसले, किसन भिंगारदिवे आदी.
अहिल्यानगरसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हतबल झाला असून सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आहेत. अजित दादा आणि अहिल्यानगर शहर यांचे अतूट नाते आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून घडले होते. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, “शहराच्या इतिहासात एवढा मोठा निधी कधीही मिळाला नव्हता. तो निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजित दादा पवार यांनी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी दिला. त्यांनी नेहमीच दर्जेदार विकासकामांकडे लक्ष दिले. वयाच्या ७०व्या वर्षी दादांनी मला न्याय देत सर्वसामान्य कार्यकर्त्याला पारनेर मतदारसंघाचा आमदार केले. अहिल्यानगर शहर हे अजित दादा यांच्या विचाराचे आहे.
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले, “स्वर्गीय अजित दादांनी सर्वात जास्त नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना न्याय आणि प्रेम दिले, म्हणूनच विकासाची कामे मार्गी लागली. दादांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडायची आहे.
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, “माझ्या तीस-पस्तीस वर्षांच्या राजकारणाच्या कार्यकाळात कधीही एवढा मोठा निधी मिळाला नव्हता. तो निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अजित दादांनी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी दिला. माझ्या प्रभागामध्ये नगरकरांच्या हक्काचे हॉस्पिटल व क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले. हे काम स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण झाले. त्यांच्या हस्तेच या वस्तूंचे उद्घाटन करायचे होते, मात्र ते स्वप्नच राहिले. कार्यकर्त्यांची दखल घेणारा नेता म्हणजे स्वर्गीय अजित दादा होय.
शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, “स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या निधनामुळे सर्वपक्षीय शोकसभा दिनांक २ फेब्रुवारी रोजी सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. अजित दादांनी आपल्या परखड वाणीतून जनतेची मने जिंकली. स्पष्ट वक्तेपणामुळे ते संपूर्ण देशाला परिचित होते. जातिपातीच्या पलीकडचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजकीय वाटचालीत संघर्ष केला. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अजित दादांची स्नेहाचे संबंध आले आणि नगरकरांच्या विकासाची वाट मोकळी झाली. निवडणुकीच्या काळात आपण जनतेसमोर मते मागण्यासाठी जात होतो, तेव्हा मतदारांना केलेल्या विकासकामांची आठवण करून दिली जात होती, ही अभिमानाची गोष्ट होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा