श्रद्धांजली

मोठ्या भावाच्या मायेने पाठीशी उभा राहणारा माझा आधार हरपला: आमदार संग्राम भैय्या जगताप आमदार जगताप यांनी व्यक्त केल्या शोक भावना

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 30 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री आजित दादा पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. काल दि. 29 जानेवारी त्यांचा अंत्यविधी झाला. नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी काल स्वर्गीय अजित दादा पवार यांचे शेवटचे दर्शन घेतले, यावेळी त्यांनी त्यांच्या शोक भावना व्यक्त केल्या,  दादा, घड्याळ तेच होतं पण वेळ चुकली… माझ्यावर नेहमीच लहान भावाप्रमाणे विश्वास दाखवणारा, मोठ्या भावाच्या मायेने पाठीशी उभा राहणारा माझा आधार आज हरपला. तुम्ही फक्त माझे नेते नव्हता, तर राजकारणाच्या पलीकडे माझे हक्काचे माणूस होतात. तुमच्या विचारांनी आणि खंबीर नेतृत्वाने माझ्यासारख्या अनेकांना घडवलं.
अहिल्यानगरवर तुमचं अतोनात प्रेम होतं… अहिल्यानगरची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही नेहमी आग्रही राहिलात. दादा, अहिल्यानगर तुमचा ‘बालेकिल्ला’ म्हणून सदैव अबाधित राहील. तुमच्या आठवणींच्या पाऊलखुणा या मातीत कधीही पुसल्या जाणार नाहीत.
दिलेला वादा पूर्ण करणारे, शब्दाला पक्के असणारे आपले दादा गेले… अशा शोक भावना व्यक्त आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी आदरणीय स्व. अजितदादा पवार यांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे