ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा उडवून देण्याची धमकी! बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कसून तपासणी!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि 30 जानेवारी -जिल्ह्याचे प्रशासन केंद्र असलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या अधिकृत मेलवर हा धमकीचा संदेश धडकला.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली असून, ‘बॉम्ब शोधक व नाशक’ पथकाकडून (BDDS) परिसराची कसून तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे