देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 7 जून : अहिल्यानगर चा इतिहास भूषण सरांनी फक्त जाणून न घेता त्याचा अभ्यास केला व तो इतिहास पिढ्यान पिढ्या कसा जतन करून ठेवता येईल याबाबत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार इतिहासकार भूषण देशमुख यांचे दि. 6 जून रोजी त्यांचे निधन झाले. काल सायंकाळी नालेगाव येथील अमरधाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप बोलत होतेf.
यावेळी
माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, पद्मश्री पोपटराव पवार शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे, स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे निवासी संपादक सुधीरभाऊ लंके, विजयसिंह होलम,राम जोशी, सुदाम देशमुख, ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल शहा, देवीप्रसाद अय्यंगार, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर प्रा. जयंत गायकवाड माजी नगरसेवक सचिन पारखे, देशस्तंभ न्यूजचे महेश भोसले, विठ्ठल शिंदे, विक्रम बनकर, ज्येष्ठ चित्रपट, समीक्षक भगवान राऊत, संजय धोपावकर सर, चित्रकार प्रमोद जगताप, डॉ. सुधाकर शेलार,शिवसेना नेते दिलीप सातपुते, साईराम गारडे, अविनाश कराळे,मिलिंद देखणे,डॉ. हनुमंत गायकवाड,अतुल लहारे,मकरंद घोडके, जालिंदर बोरुडे,शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजीराजे कदम, जेएसएस गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया ,वाजीद शेख,सचिन शिंदे, भाजपचे अभय आगरकर, सुदाम लगड,प्रा. एस. पी. कदम, जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, अमित आवारे, जेष्ठ पत्रकार छायाचित्रकार मंदार साबळे, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, यांच्या अंत्यविधी प्रसंगी पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार संग्राम भैय्या जगताप म्हणाले या ठिकाणी शेकडो लोकांनी भूषण सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तू माणूसच असा होता की तो ज्या व्यक्तीला भेटेल त्या व्यक्तीला तो आपलासा वाटायचा इतिहासकार म्हटलं की इतिहासाबद्दल प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायची एक वेगळी आवड असते. अहिल्यानगर दर्शन जिल्हा दर्शन या वेगवेगळ्या संकल्पना ते सातत्याने आमच्या बरोबर मांडत होते. अशा शोक भावना आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी व्यक्त केल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा