श्रद्धांजली

आमदार संग्राम भैय्या जगताप, नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अहिल्यानगर शहरात 15 कोटीचे “संविधान भवन” उभारणार ही बाब कायम आंबेडकरी जनतेच्या लक्षात राहील : सुनील शिंदे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 28 जानेवारी : अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दि. 27 जुलै 2025 रोजी करण्यात आले. यावेळी नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशभाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अहिल्यानगर शहरात 15 कोटी रुपयांचे “संविधान भवन ” उभारण्याची त्यांची घोषणा कायमच तमात आंबेडकरी चळवळ व आंबेडकरी जनतेच्या लक्षात राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण प्रसंगी त्यांनी आंबेडकरी जनतेला केलेला “जयभिम “

हे आंबेडकरी जनता विसरणार नाही. अशा शोकभावना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी देशस्तंभ न्यूज नेटवर्क ला बोलतांना व्यक्त केल्या. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने राज्यातील जात, धर्म, न मानणारा धर्मनिरपेक्ष नेता गमावला असल्यामुळे राज्याची मोठी हानी झाली असल्याच्या शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे