देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 3 ऑगस्ट: फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ रिपब्लिकन नेते माजी जिल्हा परिषद सदस्य, मुळा साखर कारखान्याचे माजी संचालक आंबेडकरी चळवळीचा अहिल्यानगर जिल्ह्याचा बुलंद आवाज आज कायमचा शांत झाला. काल दि. 2 ऑगस्ट रोजी शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांच्यावर उपचार सुरु असताना वयाच्या 72 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अंत्यविधी जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा जयभीम केला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बहुजन शिक्षण संघांचे विश्वस्त ऍड. संघराज रुपवते,भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी फोनवरून गायकवाड यांना श्रद्धांजली वाहत आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आरपीआयचे जेष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर,विजयराव वाघचौरे,बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, बाळासाहेब गायकवाड,विशेष सरकारी वकील सुरेश लगड,ऍड. वाल्मिक तात्या निकाळजे,अशोक बागुल उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश तात्या घुले, माजी नगरसेवक अजय साळवे,भाजपाचे शहरअध्यक्ष अनिल मोहिते,मराठा महासंघांचे संभाजीराव दहातोंडे, नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, सुनिल क्षेत्रे, चर्मकार महासंघांचे संजय खामकर,संपादक विठ्ठलराव लांडगे,माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, देवळाली नगर परिषदेच्या नगर सेविका सुनिता सुवेंद्र थोरात, आरपीआय गवई गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत म्हस्के, शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विक्रम राठोड,आदींनी दिवंगत अशोकराव गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आरपीआय चे जेष्ठ नेते विजयराव भांबळ,प्रा. जयंत गायकवाड, दादासाहेब रुपवते विदयालयाचे प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी,कॉम्रेड अनंत लोखंडे,महेंद्र राजगुरू,प्राध्यापक भीमराव पगारे भीमराव,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, आरपीआयचे युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे,पत्रकार महेश भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबरमे, शहर विभागीय पोलीस उप अधिक्षक दिलीप टिपरसे,जल अभियंता परिमल निकम,सृजन नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक महेश लोंढे,नगरसेवक मनोज दुल्लम,नगरसेवक विजय गव्हाळे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड,माजी नगरसेवक अनिल शेकटकर,संपादक सुधीर लंके, श्रीराम जोशी,ऍड. संदीपकुमार पाखरे,ऍड. कार्तिक म्हस्के, नगरसेवक निखिल वारे, सुनिल हिवाळे, सारंग पटेकर, आरपीआय चे शहर जिल्हा अध्यक्ष किरणभाऊ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिंगार शहर अध्यक्ष सिद्धार्थ आढाव,कास्टट्राईब संघटनेचे एन. एम. पवळे,माजी प्राचार्य निवृत्ती आरु, अजय भिंगारदिवे, डॉ. शशिकांत पाचारणे, प्रा. सतीशकुमार चाबुकस्वार,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे,प्रा. माणिक विधाते,प्रा. डी. आर. जाधव, प्रा. एल. बी. जाधव, प्रा. हनुमंत गायकवाड, प्रा. विलास साठे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बौद्धाचार्य दिपक अमृत, संजय भिंगारदिवे, संजय कांबळे,जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षल काकडे, सुजित घंगाळे, दिलीप साळवे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे, याकूब वडागळे,विजय वडागळे,विवेक विधाते, विकास रणदिवे, विनोद गायकवाड, प्रवीण चाबुकस्वार, ऋषी विधाते, समीर भिंगारदिवे, प्रमोद थोरात,मृणाल भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे,ग्रामपंचायत सदस्य हर्षल कांबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन सेनचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, आकाश कदम, जय कदम, विशाल कांबळे, जीवन कांबळे, पोपट पाथरे,प्रवीण सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख रोहित (बंडू ) आव्हाड, भीमशक्तीचे शहर अध्यक्ष संजय जगताप,प्रकाश साळवे,किशोर साळवे, विजय शिरसाठ,संजय साळवे, नितीन साळवे, राहुल अजय साळवे,निलेश शिंदे,मनोज रणमले, निखिल अजय साळवे, सुजित साळवे,दया गजभिये, शनेश्वर पवार, सुखदेव साळवे, ऍड. संतोष गायकवाड, बाजीराव भिंगारदिवे, विद्वान भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, चंद्रकांत ठोंबरे, रमेश भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे,अजिंक्य भिंगारदिवे, राहुल आल्हाट, सुधीर देठे, शेखर पंचमुख, संदीप वाघमारे, भाऊसाहेब देठे, कौशल गायकवाड, विशाल गायकवाड, चंद्रकांत वाघचौरे, गोविंद वाघचौरे, शशिकांत वाघचौरे, सुबोध वाघचौरे, रमेश कांबळे, अंकुश मोहिते, येशूदास वाघमारे,पत्रकार किरण बोरुडे, गणेश गायकवाड, संघा गायकवाड, अनिकेत विधाते, सुरेश भिंगारदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष रेश्माताई आठरे, अनुसयाताई गायकवाड,संध्याताई मेढे, गौतमीताई भिंगारदिवे, जयश्रीताई गायकवाड,तसेच जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा