श्रद्धांजली

सहकारमहर्षी स्व. सुवालाल गुंदेचांनी बँकिंग क्षेत्रासाठी दिलेले योगदान दिशादर्शक – किरण काळे ; जयंती निमित्त अभिवादन सभा संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 21 एप्रिल : (प्रतिनिधी ): सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा हे तपस्वी होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान सहकारासाठी आदर्शवत आणि दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. स्व. गुंदेचा यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संजय झिंजे, मनोज सुवालाल गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अनंत गारदे, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, सुशांत म्हस्के, प्रतीक बारसे, राम वाणी, राम झिने, प्रा. अमोल खाडे, रोहन शेलार, मतीन शेख, विकेश गुंदेचा, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, नीता बर्वे, अर्चना गायकवाड, शारदा वाघमारे, उषा भगत, शैला लांडे, रजनी ताठे, मीना रणशूर, रूपाली आपरे, लोकेश बर्वे, विजय शिरसाठ, चंद्रकांत उजागरे, जयराम आखाडे, विनोद शिरसाट, राम धोत्रे, सोनू देशमुख, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, निलेश लांडे, आप्पासाहेब लांडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्व. गुंदेचा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, सुवालालजींनी बँकिंग क्षेत्रामध्ये कायम चांगल्या लोकांना संधी देण्याचे काम केलं. बँकेचा कारभार आदर्शवत चालवला. आज ते हयात नाहीत. मात्र त्यांचे विचार जिवंत आहेत. त्यांचे चिरंजीव मनोज गुंदेचा हे त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. सुवालालजीं प्रमाणेच प्रामाणिकपणा, निष्ठा, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यामध्ये तळमळ आहे. मनोज गुंदेचा आज जैन समाजाच बँकिंग, सामाजिक व राजकीय क्षेत्रात समर्थपणे करत आहेत.
यावेळी मनोज गुंदेचा म्हणाले की, स्व. सुवालाल भाऊंनी आयुष्यभर प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली. सहकार आणि बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेले मापदंड आजच्या पिढीसाठी दिशा देणारे आहेत. बँकिंग क्षेत्र सातत्यपूर्ण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यामध्ये अग्रेसर राहायचे असेल तर व्यवहारांमध्ये शतप्रतिशत पारदर्शकता असायला हवी, हा त्यांचा आग्रह आज आम्हाला सहकारामध्ये काम करत असताना अडचणीच्या परिस्थितीमध्ये सातत्याने दिशा देत असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय झिंजे यांनी केले. आभार प्रतीक बारसे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे