ब्रेकिंग

आंबेडकरी चळवळीचा आधारवड हरपला! जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे निधन!

 

देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 2 ऑगस्ट : फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड (वय : 72)यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.काल दि. 1 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथे उपवर्गी हटाव याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकी दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. आज अहिल्यानगर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, नातेवाईक व अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा आधारवड हरपल्याची भावना कार्यकर्त्यामधून व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा नगर शहर व तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अखेरचा जय भिम!!🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे