देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 2 ऑगस्ट : फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते
नीलक्रांती चौक गौतमनगर येथील रहिवासी प्रताप तबाजी रोकडे( वय : 65)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, पुतणे नातेवाईक व मित्र परिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने निलक्रांती चौक, सिद्धार्थनगर व शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नातेवाईकामधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे. त्यांची अंत्य यात्रा त्यांच्या राहत्या घरातून सिद्धार्थनगर येथून निघणार आहे.
समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा