श्रद्धांजली

मा. श्री. अजितदादा पवार यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल… महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची आदरांजली

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुबंई दि. 28 जानेवारी: दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले राज्याचे माननीय
उप मुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार अचानक वेळेआधी आपल्याला सोडून गेले… आज दिनांक 28 जानेवारीचा दिवस या अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटनेने उजाडला ज्यामुळे आपण सर्वच शोकमग्न झालो आहोत. माननीय श्री. अजितदादा आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन अजूनही तयार नाही, इतकी ही घटना अनपेक्षित आणि खोल वेदनादायी आहे. वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. माझी माननीय
श्री. अजितदादा यांना आणि या दुर्दैवी विमान अपघात घटनेत प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली… ओम् शांती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे