निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू! बारामती तालूका पंचायत समिती, व जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी बारामतीकडे येत होते

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पुणे : दि.28 जानेवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी अजित पवार नेहमीप्रमाणे विमानाने बारामतीकडे येत होते.
मात्र, बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा वैमानिकाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान धावपट्टीवर जोरात आदळले. विमान आदळताच त्याला भीषण आग लागली, ज्यामध्ये अजित पवारांसह विमानातील सहा जनाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डीजीसीएने दिली आहे. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे.
​प्राथमिक माहितीनुसार, वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे, मात्र अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बारामती परिसरात एकच खळबळ माजली असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या नेत्याच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विमानतळाच्या दिशेने धाव घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. असून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्कच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे