देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :दि. 5 फेब्रुवारी: विळद घाट येथील डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत शेंडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.* यावेळी सरपंच सौ. प्रयागा लोंढे, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. संतोष फलके, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुरेश देठे, ग्रामविकास अधिकारी अशोक बोरुडे, तलाठी भाऊसाहेब संदीप कोतकर, संतोष शिंदे, कृषि महाविद्यालयाचे प्रा. के. एस. दांगडे, पर्यावरण मित्र गोरक्षनाथ गवते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. भाऊसाहेब मोरे, प्रा.डॉ. दीपिका मावळे, श्री.संतोष फलके हे होते. हा उपक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पुनम ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या *शेतकरी चर्चासत्रात ओला कचरा- खताचे उत्तम स्त्रोत, मृदा व जलसंधारणाचे शाश्वत शेतीतील योगदान, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी योजना या विषयांवर सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी चर्चासत्र यशस्वीतेसाठी कृषिदूत दर्शन बोर्डे, ओम दुसुंगे, राहुल जाधव, वेदांत मुंगसे, श्रीहरी सरवदे यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा