संपादकीय

दुष्काळातील 50,000 रु,! अशोक गायकवाड यांनी मांडले वास्तव!

1972 चा दुष्काळ तीव्र होता !
श्रीमंत असणारी कुटुंबे !
रोजगार हमीच्या कामावर दिसत होती !
“सुकडी !निळवा !किडलेला गहू ! बलगर !
यांचेवर गुजराण होत असायची !

मी नगरला कॉलेज ला !
माझी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संघटना !
कॉ.सुरेश गवळीची पुरोगामी युवक संघटना !
श्री.नंदकुमार झावरेची, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन !
ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना,राहण्यासाठी ” ड्राय ”
हॉस्टेल ची मागणी जोर धरू लागली होती !
यशवंतराव चव्हाण साहेब,यांची ‘पोलिस रिक्रेशन हॉल ‘
ला मिटिंग होती !
आंदोलन नेते म्हणून आम्हाला बोलावले !
न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज वर आमचा मोर्चा अडवला
होता !
विद्यार्थी तीव्र होते ! दगडफेक सुरु झाली !
आमचं शिष्टमंडळ भेटून आलं !
चव्हाण साहेब !निघून गेले !अन !
लाठीचार्ज चा आदेश पोलिसांना दिला !
रस्त्याने पळताना!दमछाक झाली !
पोलीस तंगड्या पाहून मारीत होते ! सगळा जमाव
सारडा कॉलेज व गोपाळ समाज्याच्या स्मशानभूमीत
पसरला ! विद्यार्थी पुढे,पोलिस मागे !
आमच्यावर गुन्हे दाखल झाले !पोलीस म्हटले की,
चड्डी पिवळी व्हायची !
आमची वसतिगृहाची मागणी मंजूर झाली !
मला वसतिगृह समितीवर शासनाने नेमले !

मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते !
आपल्या जिल्ह्याचे मंत्री बाबुराव भारस्कार होते !
मी परीक्षा फी माफीसाठी मोर्चा काढला !
पोलिसांनी आमची भेट नाईक साहेबांशी घालून दिली !
शासकीय विश्रामगृह येथे आलो ! त्याला भिरभिराचा बंगला म्हणायचे !
नाईक साहेबांच्या हाताला प्लास्टर होते !
जाड भिंगाचा चष्म्या!गळाबंद कोट !
मुख्यमंत्री कसा असतो हे मी पहिल्यांदा पहिला !
ते मला म्हणाले!परीक्षा फी माफी पाहिजे का ?
मी मान हलवली !
जिल्ह्यात किती विध्यार्थी मागासवर्गीय आहेत ?
त्यांचा दुसरा प्रश्न ?
माझ्या पायात कापर भरलं ! ओठाला कोरड पडली !
कुणी तरी म्हणालं !1000 असतील !
जीव सावरला !
त्यांचा पुढचा प्रश्न !एका विद्यार्थ्यांची परीक्षा फी किती ?
मी म्हणालो !50 रुपये !
ते म्हणाले ! यांना 50,000 रुपये मंजुर करा !
आम्ही पाहतच राहिलो !
असे मुख्यमंत्री होणे नाही !!!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे