सामाजिक
पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा या मार्गावरील नूतन १४० पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून उपनगरांमध्ये नागरिकांची वस्ती वाढत आहे. मुंबईच्या धर्तीवर बसवण्यात आलेल्या या आधुनिक पोल आणि दिव्यांमुळे आता हा संपूर्ण महामार्ग उजळून निघणार आहे. यामुळे केवळ प्रवासाची सुरक्षाच वाढणार नाही, तर या परिसरातील व्यापारीकरणाला आणि शहराच्या वैभवालाही मोठी चालना मिळणार आहे.
याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या पोलवर अनधिकृत फ्लेक्स किंवा केबल लावणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. आपले शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
महापौर ज्योतीताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले.
नगरसेवक: अविनाश घुले, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, ऋग्वेद गंधे, बाळासाहेब पवार, रामदास आंधळे, डॉ. सागर बोरुडे, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, अजय ढोणे, महेश तवले.
नगरसेविका: पुष्पाताई बोरुडे, वर्षा सानप, सोनाबाई शिंदे, सुजाता पडोळे.
इतर मान्यवर: दगडू मामा पवार, शहर अभियंता मनोज पारखे, गजेंद्र भांडवलकर, सचिन जगताप, सतीश शिंदे, सुधीर लांडगे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगरला आधुनिक आणि सुंदर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!



