देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 24फेब्रुवारी : घराचे बांधकाम चालू असतांना घरातील महिलेला शेजारील 10 ते 12 गावागुंडानी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावात ही घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मार्थाबाई दिलीप कांबळे रा. निवडुंगे, ता. पाथर्डी यांच्या घराचे बांधकाम चालू असतांना दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी घरा शेजारील राहणाऱ्या आकाश इंद्रजित शिंदे, हर्षद प्रल्हाद शिंदे, अनिल कुंडलिक शिंदे, इंद्रजित रतन शिंदे, भिमराज कचरू शिंदे,राहुल किसन शिंदे, मार्क्स कचरू शिंदे, लहू किसन शिंदे, मीना भीमराज शिंदे, कामिनी अनिल शिंदे, कमल मार्क्स शिंदे, माग्रेट विजय शिंदे, जया लहू शिंदे, आदींनी मार्थाबाई कांबळे यांना पाठीवर नखे ओरबडत चावा घेत अमानुषपणे मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील रोख तीस हजार रुपये व एक तोळे सोने चोरून नेले. तसेच घराचे घराचे नुकसान करत बांधकाम पूर्णपणे तोडून टाकले, 300 व 200 लिटरच्या पाण्याच्या टाक्या फोडल्या 5 गोणी सिमेंटमध्ये पाणी ओतून सिमेंट खराब केले. याबाबत मार्थाबाई कांबळे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला या प्रकरणी धाव घेतली असता, पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मार्थाबाई कांबळे, त्यांच्या विवाहित मुली कांचन सतीश खापरे, वर्षा गणेश गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात धाव घेऊन अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक वैभव कुलबर्मे यांची भेट घेत आपली कैफियत मांडली, व निवेदन दिले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून सबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करू असे तोंडी आश्वासन दिले आहे.
यावर आता पाथर्डी पोलीस स्टेशन काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा