देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : (विशेष संपादकीय महेश भोसले) अहिल्यानगर: दि. 26 जुलै: मार्केटयार्ड येथे सन 1961साली तत्कालीन समाज कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत व त्यावेळेसचे अहमदनगर नगरपालिकेचे नगर अध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापन करण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याची जागा
उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा घेतोय! विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्या रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मार्केटयार्ड या ठिकाणी मोठया आनंदात संप्पन्न होणार आहे. ही आंबेडकर जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे.खरंतर विविध गटात विखूरलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सातत्याने गेली पंचवीस ते तीस वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरात पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी मोर्चे,आंदोलन, उपोषण, बैठा सत्याग्रह केला, वेळ प्रसंगी आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवत सर्वांनी एकत्रित येऊन शासन दरबारी पूर्णाकृती पुतळ्याचा आग्रह धरला. यासर्व संघर्षात शासनाकडून आंबेडकर जनता व कार्यकर्त्यांना आश्वासना पलीकडे ठोस आणि खात्रीलायक काहीच मिळत नव्हते. कारण या महानगर पालिकेच्या जागेवर हॉटेल सुखसागर नावाचे रेस्टॉरंट होते. व त्याला त्या ठिकाणाहून काढणे हेही सोपे नव्हते, रस्त्यावरची मोक्याची जागा होती. यासर्व विषयाचे व आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप व महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी न्यायालयीन लढाई लढत शासन दरबारी पाठपुरावा केला. व जागा मिळवली.आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आंबेडकरी जनतेच्या बाजूने निकाल लागला म्हणून जल्लोष केला, त्यांनतर काही दिवसांनी रेस्टोरंट मालकाला ती जागा न्यायालयायच्या आदेशानुसार प्रत्यक्षात रिकामी करण्याच्या वेळेस परत संघर्ष वाटयाला आलाच त्यावेळेस रिपब्लिकन चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई ), वंचित बहुजन आघाडी (ऍड. प्रकाश आंबेडकर ) व शिव,फुले, शाहू, आंबेडकर, साठे यांच्या विचारास मानणाऱ्या विविध सन्घटनानी आपल्या संघटना व पक्षीय जोडे बाजूला ठेवत “डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समिती”ची निर्मिती केली.व या संघर्ष समितीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्या समोर एक दिवसाचा बैठा सत्याग्रह केला. अर्थात विधानसभा निवडणुकी नंतर आता, या एकाच समितीच्या दोन समित्या झाल्या हा वेगळा विषय असो!
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समिती आहे. ही समिती तसेच महानगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या या सोहळ्याचे भव्य दिव्य या महा सोहळायचे स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम भैय्या जगताप हे आहेत. हा कार्यक्रम भन्ते डॉ. राहुल बोधी यांच्या उपस्थितीत बौध्द पद्धतीने त्रिशरण, पंचशील, व बौद्ध वंदना घेऊन सम्पन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वच रिपब्लिकन नेत्यांना निमंत्रीत केले आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम देखील अहिल्यानगरसाठी पर्वनीच ठरणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीचे,महानगर पालिकेचे जल अभियंता परिमल निकम, समितीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड,युवा नेते सुरेश बनसोडे, प्रा. डी. आर. जाधव, जेष्ठ नेते, विजयराव भांबळ, संभाजी भिंगारदिवे, प्रा. विलास साठे, प्रा. भीमराव पगारे,नाथा भिंगारदिवे, प्रा. जयंत गायकवाड, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, अजय साळवे, राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड,सुनील क्षेत्रे, सुनील शिंदे, महेश भोसले, सुरेशराव भिंगारदिवे, संजय जगताप, पोपट जाधव, नितीन कसबेकर, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, अमित काळे,अजिंक्य भिंगारदिवे, कौशल गायकवाड,नाथाभाऊ आल्हाट, विशाल भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, विशाल गायकवाड, विशाल कांबळे, गणेश गायकवाड, दिपक लोंढे, जयाताई गायकवाड, गौतमीताई भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, राधा पाटोळे, सागर ठोकळ, विवेक विधाते, सागर विधाते, ऋषी विधाते, संजय ताकवले, सदानंद भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, दिपक साळवे, येशूदास वाघमारे, शांतवन साळवे, शनेश्वर पवार, दया गजभिये, सिद्धांत गायकवाड, संजय साळवे, यांच्यासह समितीतील सर्व सन्माननीय सदस्य प्रयत्न करत आहेत. या सोहळ्यास अहिल्यानगर वासियांनी व सर्व आंबेडकरी जनतेने मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन महा सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. 27 जुलै 1978 या ऐतिहासिक दिवशी विधान भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे असा नामविस्तार ठराव प्रारित झाला तोच उद्याचा ऐतिहासिक दिवस 27 जुलै 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी सज्ज झाला आहे.
” चला तर मग, अहिल्यानगर मध्ये उद्या उगवणाऱ्या सोनेरी दिवसाचे, सोनेरी पानाचे, सोनेरी क्षणाचे हसतमुखाने स्वागत करूया,वाट कसली पाहताय, मतभेद, मनभेद विसरून ऐतिहासिक सोनेरी दिवसाचे, डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होऊ या! “
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा