सावरकरांपेक्षा छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे कार्य महान – किरण काळे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर दि. १५ एप्रिल (प्रतिनिधी) : आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. विनायक सावरकरां पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट समोरील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला किरण काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
काळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी सर्व धर्म समभावाचे संविधान या देशाला दिले नसते तर आज व्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तमाम शिवप्रेमींना अभिमानाचा, गर्व आहे. जगात असा राजा आजवर झाला नाही. क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना छेद देत शिक्षणाची कवाडं खुली केली नसती तर आज बहुजन समाज शिकू शकला नसता. शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच काम केले. छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकरांच्या कामाच्या तुलनेत सावरकर यांचे काम अत्यंत छोट्या स्वरूपाचे होते, असे विधान यावेळी काळे यांनी केले.
यावेळी काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापु चंदनशिवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वनंम, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, जिल्हा सरचिटणीस मनसुखभाई संचेती, रतिलाल भंडारी, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, युवक सरचिटणीस आकाश आल्हाट, अभिनय गायकवाड इंजिनिअर सुजित क्षेत्रे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, मायाताई चंदनशिवे, विकी करोलिया, हर्षल काकडे, रोहित वाकडे, रजत सारंगधर, शंकर आव्हाड, आप्पासाहेब लांडगे, युवक शहर संघटक विनोद दिवटे, युवक शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, सुहास त्रिभुवन, रामभाऊ धोत्रे, ब्लॉक काँग्रेस कमिटी सदस्य हनीफ मोहम्मद जहागीरदार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.