कौतुकास्पद
दादासाहेब रुपवते विद्यालयाचा मी माजी ,विदयार्थी, विद्यालयाची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू : नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे


दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेनल प्रसंगी ते प्रमुख मान्यवर म्हूणन बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, विदयालयाची विद्यार्थी पट संख्या वाढविण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करू, तसेच महानगर पालिकेच्या माध्यमातून येथील गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी, कार्यकारी रजिस्ट्रार प्रा. रवींद्र एडके, माजी कार्यकारी रजिस्ट्रार प्रा. व्ही. एम. बैचे, पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड, माजी प्रा. भीमराव पगारे, देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे महेश भोसले, शिक्षक प्रतिनिधी प्रा. किरण इंगळे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (सामाजिक न्याय विभाग ) भिंगार शहर अध्यक्ष सिद्धार्थ आढाव, आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर महानगर पालिकेचे उपमहापौर ऍड. धनंजय जाधव हे बोलतांना म्हणाले, माझे वडील सलग आठ वेळेस नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यामुळे आम्हाला पण हा राजकीय वारसा लाभला, आमच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्व जाणून आम्हाला शिकविले आज मी महानगर पालिकेच्या उप महापौर पदावर शिक्षणामुळे आहे. विध्यार्थ्यांनी भरपूर शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी करत असताना दादासाहेब रुपवते विदयालयाचे माझे जुने जिव्हाळ्याचे नाते असून या विद्यालया अडचणी महानगर पालिकेच्या माध्यमातून सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षण संघांचे माजी रजिस्ट्रार प्रा. व्ही. एम. बैचे हे होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले जे शिक्षणापासुन वंचित राहिले असते त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य कालकथित बहुजन शिक्षण संघांचे संस्थापक दादासाहेब रुपवते यांनी केले. त्यांच्यानंतर कालकथित प्रेमानंद रुपवते यांनी ही संस्था सांभाळली, विद्यालयाची पट संख्या कशी वाढेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या स्पर्धेतून वर्षभर केलेल्या मेहनतीचे फलित म्हणून स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला जातो. असल्याचे ते म्हणाले,
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक जयंत गायकवाड यांनी केले. अध्यक्षीय सूचनेला विद्यालयाच्या वतीने अनुमोदन प्रा. वाघमारे यांनी दिले.यावेळी प्रा. संदीप पाखरे सर,प्रा. यादव सर, अजय भिंगारदिवे सर, भीमराव जाधव,संबोधी विदयार्थी वसतिगृहाचे अधीक्षक रवींद्र तपासे संघर्ष साळवे, राजू ससाणे, श्रीमती पटेकर मॅडम ,श्रीमती पवार मॅडम, श्रीमती साठे, विद्यार्थी प्रतिनिधी नम्रता भोसले व अनुष्का उंबरे तसेच विदयार्थी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवन साळवे सर यांनी केले. तर आभार एस. पी. कदम सर यांनी मानले.