कौतुकास्पद

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर बेलवंडी पोलिसांचा छापा!

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : श्रीगोंदा : दि. 28 मे : मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब यांना गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल दोस्ती पारगाव, हॉटेल संजोग, हॉटेल वैष्णवी, हॉटेल निसर्ग, सर्व श्रीगोंदा या ठिकाणी अवैधरित्या देशी व विदेशी प्रकारची दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी तत्काळ कारवाई करणे कामी कळवल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस पथक असे पारगाव व श्रीगोंदा शहरातील वरील ठिकाणी जाऊन खात्री केली असता हॉटेल दोस्ती पारगाव येथे इसम दत्तात्रेय बाळू बोरुडे राहणार बोरुडेवाडी याचे ताब्यात 33925/- रुपये किमतीचा तसेच हॉटेल
संजोग काष्टी रोड श्रीगोंदा येथे इसम विशाल शामराव कळसकर याचे ताब्यात 1405 /- रुपये किमतीचा, हॉटेल निसर्ग आढळगाव रोड श्रीगोंदा येथे इसम विक्रांत संजय ससाने राहणार गांधीनगर बोलेगाव तालुका जिल्हा नगर यांच्या ताब्यात 18945/- रुपये किमतीचा, हॉटेल वैष्णवी आढळगाव रोड श्रीगोंदा येथे इसम अविनाश अशोक खवळे राहणार आवटेवाडी तालुका श्रीगोंदा यांच्या ताब्यात 8110/- रुपये किमतीचा असे
एकूण 62,345/- अवैधरित्या देशी-विदेशी प्रकारची दारू मिळून आलेने छापा कारवाई करण्यात आली आहे.
सदर बाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवलदार संदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल राजू भोर , विनोद पवार व होमगार्ड यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे