कौतुकास्पद

मिलिट्री इंटेलिजेन्स च्या मदतीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडया! आरोपींकडुन 4 गावठी कट्टे, 10 जिवंत काडतुसासह 2,76,000/- रु कि.चा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 28 मे :मिलिट्री इंटेलिजेन्स च्या मदतीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून  बेडया ठोकण्यात यश आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक 26/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना मिलिट्री इंटेलिजेन्स, साउथ कमांड, अहिल्यानगर इनपुट, यांचेकडुन मिरावली पहाडाचे पायथ्याजवळ, बुऱ्हानगर रोड, भिंगार, ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम अग्नीशस्त्रासह दरोडा घालण्याचे तयारीत थांबलेले असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखील तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सुनिल पवार, विष्णु भागवत, शाहिद शेख, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन बातमीतील ठिकाणी कारवाई करणे कामी रवाना करण्यात आले. पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी 05 इसम संशयीतरित्या उभे असल्याचे दिसुन आले. पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यातील एक इसम मोटार सायकलवर भरधाव वेगात पळुन गेला. पथकाने उर्वरीत इसमांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असुन ताब्यातील इसमांना त्यांचे नांव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) मुस्ताक ईक्राहीम शेख वय 22 वर्षे, रा. कोंढवा, आश्रमनगर, पुणे, 2) विराट उर्फ विल्यम रविंद्र मेहंदळे वय 26 वर्षे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, 3) समर्थ बाबासाहेब माडळकर वय 19 वर्षे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, 4) समर्थ राजेंद्र दुधभाते वय 18 वर्षे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाबाबत विचारपुस करता इसम विराट रविंद्र मेहंदळे याने पळुन गेलेल्या इसमाचे नांव 5) आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे, रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
आरोपींचे अंगझडतीत 1 गावठी कट्टा, 1 जिवंत काडतुस, कोयता, चाकु, मोबाईल असा एकुण 1,71,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 288/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5), सह आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडे देण्यात आला आहे.
गुन्ह्याचे तपासामध्ये वरील आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने त्यांची 03 दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे, रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर हा मिळुन आला असुन तपासामध्ये आरोपीकडुन 1,50,000/-रु कि.चे 3 गावठी कट्टे, 9000/-रु कि.चे 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे.
वरील प्रमाणे कारवाईमध्ये 1,90,000/-रु कि.चे 4 गावठी कट्टे, 10,000/-रु कि.चे 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकु, मोबाईल असा एकुण 2,76,000/-रु कि.चा .मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अधिक तपास चालु आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी यांचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर पुणे शहरामध्ये खुन, शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे