देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 4 फेब्रुवारी: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 29/01/2026 रोजी दुपारी 01.00 वा. चे सुमारास फिर्यादी गोदाबाई बापुराव दळवी रा. स्टेशन रोड, दळवी वस्ती, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा या शेतामध्ये शेळ्या चारत असतांना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस बोकड विकत घ्यावयाचे आहे असे सांगुन फिर्यादीचे गळ्यातील 75,000/- रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे डोरले व मनिमंगळसुत्र हिसकावुन घेवुन पळुन गेले आहेत. सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 110/2026 भारतीय न्याय संहिता 309 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.
वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन, तसेच फिर्यादीकडे आरोपीचे वर्णनाबाबत माहिती घेवुन आरोपीचा शोध घेत असतांना व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील आरोपी जाक्या काळे व त्याचे साथीदाराने केला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी 1) जाक्या बगदास काळे वय 42 रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर हा मिळुन त्याचे राहते घरी मिळुन आला. सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार 2) ओंकार शक्ती काळे रा. साळनदेवी रोड, रडेवाडी, ता. श्रीगोंदा अशांनी केला असल्याची कबुली दिली आहे.
आरोपी जाक्या उर्फ बगदाद्या उर्फ बगदास काळे हा रेकार्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 श्रीगोंदा 412/2019 भादवि कलम 324, 323, 504, 506
2 श्रीगोंदा 606/2019 भादवि कलम 324, 336, 143
3 श्रीगोंदा 866/2021 भादवि कलम 324, 323, 504
4 श्रीगोंदा 863/2022 भादवि कलम 379
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा