क्रिडा व मनोरंजन
पूर्वीच्या काळात कोणत्याही खेळाचे प्रशिक्षण नव्हते, पण आता खूप बदल झाला आहे. आता प्रत्येक खेळाचे प्रशिक्षण निर्माण झाले आहे. पूर्वी चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहिले जायचे, पण आता खेळावर चित्रपट निघत असून हे चित्रपट खेळाडूंना प्रेरणा देणारे आहेत. वाडीयापार्क येथे चांगले खेळाचे मैदान असावे जिल्हा असोसिएशनने मला राज्य सरकारकडे प्रयत्न करायला लावले व मी प्रयत्न करून 51 कोटींच्या आराखड्याची मंजुरी आणली. त्यातील पहिल्या 17 कोटीचे काम महिन्याभरात टेंडर काढून सुरु करण्यात येईल. व लवकरात लवकर हे काम सुरु करण्यात येईल. मात्र ते टिकविण्याची जबाबदारी असोसिएशनची राहणार आहे.
आता सर्वच पक्षामध्ये दोन, दोन गट निर्माण झाले आहे. पण आपल्या मध्ये असे गट निर्माण होऊ देऊ नका असा मिस्किल चिमटा देखील त्यांनी या कार्यक्रमा निमित्त काढला.असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीचे संघटन उभे करायचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.