भारताची माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांच्या हस्ते डिफेन्स स्पोर्ट्स व साईदीप हिरोस आयोजित अहमदनगर प्रीमियर लीग 14 वर्षाखालील मुला / मुलींचे स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार

अहमदनगर दि. 30 एप्रिल (प्रतिनिधी )
भारताची माजी महिला क्रिकेट पटू पूनम राऊत यांच्या हस्ते डिफेन्स स्पोर्ट्स व साईदीप हिरोस आयोजित अहमदनगर प्रीमियर लीग 14 वर्षाखालील मुला / मुलींचे स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले.
आज दिनांक 28/04/2024 रोजी गेल्या दहा दिवसापासून चालू असलेल्या अहमदनगर प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताच्या माजी महिला क्रिकेट पटू पूनम राऊत यांच्या हस्ते गुलमोहर रोड येथील डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी च्या मैदानावर पार पडले.
या वेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले त्यांनी सरावाचे महत्व,जिद्द, अपयश कसे पाचवावे,मानसिक कणखरता, क्षेत्ररक्षण आदीचे महत्व नमूद केले, अकॅडेमी च्या सुविधा, टर्फ विकेट, इनडोअर स्टेडियम, प्रॅक्टिस विकेट, मैदानावर असलेली हिरवळ याचे ही कोतुक केले. सगळ्या मुला / मुली सोबत गप्पंगोष्टी केल्या व भविष्यात नगर मधून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी खात्री दिली.
आजचा अंतिम सामना कार्तिक रॉयल्स विरुद्ध दीपक स्ट्राईकर यांच्यात झाला. या मध्ये कार्तिक रॉयल संघाने दीपक स्ट्राईकर संघाचा 7 गडी राखून पराभव केला, प्रथम फलंदाजी करताना दीपक स्ट्रायकर संघाने 8 गडाच्या मोबदल्यात 122 धावा निर्धारित 20 षटकामध्ये केल्या. त्यात सार्थक दौंड याने सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले.तरी सय्यद अम्मार याने 17 धावां केल्या. कार्तिक रॉयल संघाकडून शोर्या जठार याने 2 बळी मिळविले.
कार्तिक रॉयल ने प्रतिउत्तर देताना16.1 षटकात 3 गडाच्या मोबदळ्यात 123 धावा केल्या. या मध्ये सर्वाधिक 57 धावा राम खोमणे यांनी केल्या.तर विराज जोशी याने नाबाद 27 धावा केल्या. सार्थक दौंड याने 2 बळी मिळविले. अंतिम सामन्याचा सामनावीर राम खोमणे ची निवड झाली.
स्पर्धेमधील बेस्ट बॅटर – विराज जोशी 209 धावा
गोलंदाज – कुमारी मानिनी वायाळ 11 बळी
क्षेत्ररक्षक – समर्थ शेंडगे
विकेट किपर – समर्थ कोठवलं
मॅन ऑफ द सिरीस – सार्थक दौंड
या प्रसंगी वरिष्ठ क्रिकेटपटू श्री गोविंद मिसाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी स्पर्धेचे प्रयोजक श्री राजेंद्र चौधरी, राजीव चिटगोपिकर, सौं पल्लवी घोडके, अंबादास बेरड, अमोल घोलप, सम्राट देशमुख, विशाल बुऱ्हाडे,गोकुळ दौंड तसेच माजी क्रिकेट पटू प्रवीण अंतेपोलू, शशिकांत निऱ्हाली, कोच अतुल ठाकूर हजर होते.
स्पर्धाचे यशस्वी साठी प्रशांत अंते पोलू, विजय बरकासे, रामकिसन शिंदे, प्रतीक पवार, कुणाल अंतपोलू, हर्षल अंतपोलू, चंद्रकांत मेंगाळ, अभिषेक चिकणे, हर्षवर्धन बोर्डे, साहिल खान, सर्वाय कराळे, सुजल बत्तीन, अनुराग दत्ता, अथर्व गर्जे आदींनी परिश्रम घेतले.
या वेळी आभार प्रदर्शन अकॅडेमी चे संचालक संदीप घोडके यांनी आभार मानले.