राजकिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू असून येत्या ४ जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार: खा. डॉ. सुजय विखे

जामखेड दि. 30 एप्रिल (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू असून येत्या ४ जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. मागील १० वर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रबावी अंमलबजावणी हे मोदी सरकाच्या विजयाचे सुत्र असून देशात मोदींची हमी टिकणार असेही त्यांनी सांगितले. ते जामखेड मधिल महायुतीच्या कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते.
अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता कमी दिवसांचा अवधी उरला असल्याने महायुतीकडून आपल्या प्रचार सभांचा वेग वाढविला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जामखेड मधील जायभायवाडी येथे महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दशकाच्या पर्वात घेतलेले निर्णय देशासाठी महत्वाचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना नवी दिशा दिली. मोदी सरकारचे वेगळेपण म्हणजे कलम ३७०, तीन तलाख, राम मंदिर, समान नागरी कायदा हे सुत्र होय. सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामुळे जनता त्यांच्यावर खुष असून त्यांना पुन्हा देशाच्या शिरस्थानी बसविणार आहे. यामुळे आपल्या मताची किंमत ओळखून मतदारांनी देशाची सुत्रे कुणाच्या हाती द्यायचे आहेत याचा विचार करून मतदान करा असे त्यांनी यावेळी सांगितले. आ. राम शिंदे यांनी सुद्धा यावेळी मतदारांना संबोधित केले. आपले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरळ पोहचणार आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ. सुयज विखे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे