पत्रकार धनराज पवार यांचा ग्रामीण विकास केंद्र जामखेड संस्थेच्या वतीने सन्मान!

जामखेड दि. 8 जुलै (प्रतिनिधी )
जीवन जगत असतानी कसं लढायचं आणि कसं पुढं जायचं एवढंच नाही तर शिक्षणासाठी खडतर प्रवासातून संघर्ष करुन जीवनातील खाचखळगे भरून काढताना आपल्या माणसांची साथ कशी मोलाची हे धनराज पवार यांच्या कार्यातून दिसून येते.लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे मा.धनराज पवार समाजासमोर एक तरुण धाडशी पत्रकार म्हणून उभे आहेत.सामाजिक जाणीव असणारे पत्रकार मा.धनराज पवार यांनी पत्रकारीता क्षेत्रामध्ये उमेदीने काम करण्याची उर्जा त्यांच्या कार्यात दिसून येते. पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना “लोक पत्रकार’ म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रमाणिक पणे वाचा फोडण्याचे काम करत राहतात.
सर्व समाजातील तळागाळातील घटकांसोबत मनमिळावू वृत्तीने व जीवंत पत्रकारीता करणे हा त्यांचा सहज स्वभाव आहे.पत्रकारिता क्षेत्रात धनराज पवार यांचे काम अनमोल आहे.असे ॲड डॉ अरुण जाधव म्हणाले.
शहरातील ग्रामीण विकास केंद्र जामखेड संस्थेच्या वतीने आज रोजी दैनिक सुर्योदय चे जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार यांनी मास कम्युनिकेशन व जर्नालिझम परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड डॉ अरुण (आबा) जाधव, बापूसाहेब ओहोळ,वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, सचिन भिंगारदिवे,अनिल लष्कर,आबा साळवे,जकिर तांबोळी उपस्थित होते.