देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर :झाडे जगवा! झाडे लावा! असा मानव उपयोगी संदेश देत इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते, बहुजन हृदयसम्राट, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील झुंजार नेते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा 2 जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला,
तोही कोणताही अनावश्यक खर्च न करता, निसर्गाचे संवर्धन करत. नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सोसायटी येथे विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे,
पत्रकार महेश भोसले, विवेक विधाते, मुन्ना शेख, श्रीपाद वाघमारे, सुनिल राऊत,विकास रणदिवे, प्रा. सतीश चाबुकस्वार, अविनाश वाळके आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा