अभिनंदनीय

आष्टी तालुक्यातील हिवरा,पिंपरखेड येथील रोडेश्वर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : बीड जिल्हा (प्रतिनिधी– गोरख मोरे ) :
नुकताच एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये आष्टी तालुक्यातील मौजे हिवरा- पिंपरखेड येथील रोडेश्वर विद्यालयाने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली . रोडेश्वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले . रोडेश्वर विद्यालयाचा एकूण ८६.५३% टक्के निकाल लागला असून यामध्ये एकूण४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये विशेष प्राविण्‍यामध्ये २० विद्यार्थी तर, प्रथम श्रेणी मध्ये १४ विद्यार्थी तर , द्वितीय श्रेणी मध्ये ९ विद्यार्थी व तृतीय श्रेणीमध्ये २ विद्यार्थी या प्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .
रोडेश्वर विद्यालयामध्ये एस एस सी बोर्ड परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक–
ओव्हाळ संस्कृती सुरेश — ९३.८०% तर ,
द्वितीय क्रमांक–
गणबोटे चैतन्य अशोक — ९१.८०% तर ,
तृतीय क्रमांक–
जगदाळे दृष्टी दत्तात्रय — ९०.६०% व
इतर गुणवंत विद्यार्थी-
कापसे राजनंदिनी काकासाहेब — ८९. ८०% तर ,
शेख नय्युम खुदरत — ८९.६०% असे अनेक विद्यार्थी आहेत .
रोडेश्वर विद्यालयातील एस एस सी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विजयकुमार बांदल(आण्णा) ,अध्यक्ष अब्दुलभाई सय्यद , रोडेश्वर विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग (आण्णा) चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गव्हाणे यु. आर. सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एस एस सी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. असुन शाळेच्या या यशामुळे हिवरा-पिंपरखेड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून पालकांकडूनही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होऊन विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे