अभिनंदनीय

विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने अविनाश पवार यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत साहित्य पुरस्कार’ प्रदान

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पारनेर 11 ऑगस्ट
‘विश्वबंधुतेचा तिरंगा महोत्सव २०२६’च्या पार्श्वभूमीवर पुणे येथे आयोजित एका विशेष आणि दिमाखदार सोहळ्यात, ‘विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे’ तसेच ‘विश्वबंधुता काव्यमंच आणि काव्य प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी बंधुताचार्य प्रकाश रोकडे,ॲड प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते अविनाश पवार यांना मानाचा ‘विश्वबंधुता प्रकाशदूत साहित्य पुरस्कार’ मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. यावेळी स्वागत अध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके, प्रा. शंकर अथरे, मंदाकिनी रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा पुणे शहरात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.अविनाश पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीमुळे पारनेर तालुक्यात गौरव होत आहे.
सन्मानपत्रातील गौरवोद्गार आणि संविधानिक मूल्यांची जोपासना
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले अविनाश पवार यांना प्रदान करण्यात आलेले सन्मानपत्र. या सन्मानपत्रात त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा अतिशय मार्मिक शब्दात गौरव करण्यात आला आहे. आजच्या बदलत्या काळात सत्तेच्या विरोधात जाऊन लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत समतेचा संदेश पोहोचवणे, हे सामाजिक कार्यकर्तेचे कर्तव्य असते; आणि हेच कर्तव्य अविनाश पवार यांनी सामाजिक कार्यात चोख बजावले आहे, असा सूर याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.या संमेलनाला व पुरस्कार वितरण सोहळ्याला पुणे आणि परिसरातील अनेक नामांकित साहित्यिक, विचारवंत, कवी, तसेच सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वबंधुता साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि काव्यमंचाचे कार्यकर्ते यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे