सामाजिक
RTO च्या पत्राला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली! नियमबाह्य लाल अंबर दिवा अद्यापही सुरू, मनसे आक्रमक

- देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पारनेर : दि. 13 ऑगस्ट
केंद्र सरकारने 2017 मध्येच बंद केलेल्या VIP “लाल दिवा” संस्कृतीचे उल्लंघन करणाऱ्या *MH16DG8719* या पारनेर तहसीलदार वापरत असलेल्या वाहनावर कारवाई करण्यास आर टी ओ प्रशासन प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
मनसे ने दिलेल्या तक्रारीवरून आरटीओ अहिल्यानगर यांनी तहसीलदार पारनेर यांना पत्र लिहून तब्बल आठवडा उलटला तसेच तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्यापही त्या पारनेर तहसीलदार वापरत असलेल्या शासकीय वाहनावरील नियमबाह्य लाल-अंबर दिवा काढण्यात आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी आक्रमक पवित्रा घेणार आहे.
मनसे पारनेरचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी 05.08.2026 रोजी RTO कडे तक्रार दाखल केली होती. MH16DG87119या वाहनावर नियमबाह्य अनाधिकृत पणे लाल दिवा लावून संबंधित वाहनाला काळ्या रंगाच्या काचा लावून पारनेर तालुक्यात दहशत पसरवली जात असल्याचे फोटो पुराव्यासह सादर केलेले आहेत त्यावर कारवाई च्या भितीने फक्त काळ्या काचा काढल्या गेल्या व काळे पडदे लावून परत नियम धाब्यावर बसवून अंबर दिवा मात्र काढला गेला नाही त्यामुळे संबंधित वाहनांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसे च्या वतीने देण्यात आला होता त्यामुळे अता संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेल्या
तक्रारीची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दि. 06.08.2026 रोजी तहसीलदार, पारनेर यांना पत्र क्र. 2047 पाठवले. पत्रात केंद्र शासनाच्या एस आर 423(E) आणि एस ओ 1374(E) अधिसूचनांचा हवाला देऊन “त्काळ कारवाई करा” असे स्पष्ट निर्देश दिले.
मात्र आज आठवडा उलटूनही तहसील प्रशासनाने अद्याप स्वतः च्या गाडीवरील लाल अंबर दिवा काढला नाही नियमबाह्य दिवा असले वाहन बिनधास्त पारनेर तालुक्यात फिरत आहे.




