देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 ऑगस्ट : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. नमुद आदेशान्वये श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, योगेश कर्डीले व दिपक जाधव यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 12/08/2026 रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सांगवी भुसार गावचे शिवारातील गोदावरी नदी पात्रातून इसम नामे सम्यक बाळासाहेब मेहरखांब हा वाळु उपसा करुन वाळुची वाहुतक करत आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष गोदावरी नदीपात्राजवळ जाऊन खात्री केली असता एक इसम निळे रंगाचे पॉवरट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधुन वाळु भरुन निघण्याचे तयारीत असता मिळून आला.वाहन चालकास ट्रॅक्टर थांबवून, पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन ट्रॅक्टरचे ट्रॉलीची तपासणी केली असता त्यास वाळु मिळून आल्याने 1) सम्यक बाळासाहेब मेहेरखांब, वय 20, रा.सांगवी भुसार, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीचे कब्जातून 5,00,000/- रू किं.त्यात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली व 10,000/- रू किं.वाळु असा एकुण 5,10,000/- रू किं.मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपीविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 342/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
नमूद कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा