अभिनंदनीय

सलाम तिच्या जिद्दीला! सलाम तिच्या संघर्षाला! मागासवर्गीय कुटुंबातील पूजा मदन शिरसाठ मीरा भाईंदर पोलीसपदी निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 3एप्रिल :: प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संघर्ष करत तिने अखेर पोलीसाची खाकी वर्दी मिळवलीच म्हणूनच तिच्या जिद्दीला सलाम करावा असेच प्रत्येकाला वाटते.
मागासवर्गीय कुटुंबातील पूजा मदन शिरसाठ हिने वडिलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झालेले असताना आपल्याला पोलीस दलात भरती व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने शिक्षण घेत संघर्ष केला. मीरा भाईंदर पोलीस दलामध्ये पोलीस पदी तिची निवड झाली असून आपण संघर्ष करून मिळवलेल्या यशाबद्दल ती म्हणाली

माझ्या या यशाचा पहिला पाया एव्हरेस्ट अकॅडमी येथे रचला गेला. त्यानंतर जगदंबा अकॅडमी मधील सर्व शिक्षकांनी माझ्यातील संघर्षाची व जिद्दीची तयारी पाहून माझ्या करिअर विषयी मार्गदर्शन करण्याच्या क्लासेसचे पैसे देखील घेतले नाही. मी माझ्या यशाची श्रेय अकॅडमीच्या सर्व शिक्षकांना व शिरसाठ परिवारातील तसेच सर्व नातेवाईकांचा यामध्ये मोठा सहभाग असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.
वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर शिरसाठ यांनी तिला मोलाची मदत केली. यावेळी सिद्धार्थ नगर येथे तिला औक्षण कर पेढा भरवत नागरिकांनी तसेच शिरसाठ कुटुंबाने तिचे कौतुक करून सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अंकुश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर शिरसाठ जोसेफ शिरसाठ दत्ता भालेराव बहुजन परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता शिरसाठ, अभिजीत वाघ, द्वारका भालेराव, हेमा डावरे, वंदना सरोदे, उषाभारस्कर,सुनिता शिरसाठ, आकाश नेटके, आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अंकुश मोहिते यांनी पूजा शिरसाठ हिचे कौतुक करून तिचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या वतीने अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे