देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दिनांक 3 एप्रिल : वाढदिवस म्हटलं की शुभेच्छांची फ्लेक्सबाजी, आतिषबाजी हा अनावश्यक खर्च आलाच! परंतु या अनावश्यक खर्चाला फौजफाटा देत. सामाजिक कार्याला महत्त्व देत, मुक्या जनावरांची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळीवाडा येथील विरेंद्र (विरु )भिंगारदिवे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील अरुणोदय गोशाळेस चारा वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे,सुजित घंघाळे, समीर भिंगारदिवे, निलेश रंधवे,
विवेक विधाते आदी उपस्थित होते. चारा वाटपाच्या या समाज उपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा