देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 16 ऑगस्ट : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, राहुल द्वारके, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, भाग्यश्री भिटे व सुनिता पवार अशांचे पथक तयार करून त्यांना अहिल्यानगर शहरातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 16/08/2026 रोजी तपास पथक अहिल्यानगर शहरात अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, कोठला परिसरातील झोपडपट्टी येथील हनिफा किराणा स्टोअर्सच्या मागे पत्र्याचे शेडमध्ये काही इसम हे गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत आहेत. पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याचे शेडमध्ये दोन इसम मांसाचे तुकडे करताना मिळून आल्याने 1) कैफ शब्बीर कुरेशी, वय 47, रा.नालबंद खुंट, ता.अहिल्यनगर 2) मतीन ख्वॉजामिया कुरेशी, वय 50, रा.हमालवाडा, झेंडीगेट, नालबंद खुंट, अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन, त्यांचे कब्जातून 48,000/- रू किं.160 किलो गोमांस, 30,000/- रू किं.इलेक्ट्रीक मशीन, 4,000/- रू किं.एक वजन काटा, 1,500/- रू किं.चाकु, सुरे असा एकुण 83,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 703/2026 बीएनएस कलम 271, 325, 3(5), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5(क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा