सामाजिक

प्रभाग 9 मधील निलक्रांती चौक, गौतमनगर परिसरात डासांचा बंदोबस्त करण्यासाठी औषध फवारणी करा : महेश भोसले गौतमनगर परिसरातील नागरिकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. 17 ऑगस्ट : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांची संख्या वाढलेली आहे. या साथीच्या आजारांमध्ये डेंग्यू मलेरिया हिवताप यांचे प्रमाण मोठे आहे. साथीचे आजार प्रामुख्याने डासांमुळे होतात. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश भोसले यांनी नील क्रांती चौक गौतम नगर व आजूबाजूच्या परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेला नुकतेच निवेदन सादर केले आहे. निवेदनामध्ये सदर परिसरामध्ये मशीनद्वारे फवारणी करून परिसरातील नागरिकांचा साथीच्या आजारातून त्रास कमी व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, आरपीआय आठवले गटाचे शहर युवक अध्यक्ष निखिल अजय साळवे, राहुल अजय साळवे, अक्षय वाघचौरे, रवींद्र वाघचौरे, मेहेर मिसाळ, यश मकासरे,गौरव वाघचौरे, रुपेश भोसले, विकास साळवे,बबन पारधे, शाम पारधे, सुजित साळवे, विनोद साळवे, समाधान शिंदे, सुनंदा कांबळे, मोहिनी भोसले मीरा पंडागळे समाधान शिंदे आदींच्या सह्या आहेत. याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी लवकरात लवकर परिसरामध्ये औषध फवारणी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे