ब्रेकिंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेरचा मोठा विजय – नियमबाह्य लाल अंबर दिवा अखेर काढला_ मनसेच्या ठिय्या आंदोलनाला यश – तहसीलदारांच्या गाडीवरील अनाधिकृत लाल दिवा उतरवला_

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क पारनेर,( प्रतिनिधी ) दि. 18 ऑगस्ट : शासकीय नियम धाब्यावर बसवून पारनेर तहसीलदार यांच्या शासकीय गाडीवर लावण्यात आलेल्या नियमबाह्य लाल अंबर दिव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याने केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार  यांच्या पथकाने तहसीलदारांच्या गाडीवरील अनाधिकृत लाल अंबर दिवा काढून कारवाई केली आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार म्हणाले,
_”कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सामान्य नागरिकांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेनेच नियम मोडू नयेत. मनसेने उचललेल्या पावलामुळे हा नियमबाह्य दिवा काढला गेला आहे. हा आमचा नाही तर कायद्याचा आणि जनतेचा विजय आहे. यापुढेही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कायद्याचा भंग केल्यास मनसे अशाच प्रकारे रस्त्यावर उतरेल.”_
मनसेच्या या विजयामुळे तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे