ब्रेकिंग

निलक्रांती चौक, गौतमनगर परिसरात अहिल्यानगर महापालिकेकडून औषध फवारणी, आरोग्य विभागाला आली जाग! देशस्तंभ न्यूजच्या बातमीची घेतली दखल

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 ऑगस्ट : सध्या पावसाळ्याचे दिवस असून मलेरिया, हिवताप, डेंग्यू हे साथीचे आजार डासांच्या प्रादुर्भावामुळे वाढत आहेत. याबाबतीत प्रभाग क्र. 9 मधील निलक्रांती चौक, गौतमनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेश भोसले, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष निखिल अजय साळवे, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, मेहेर मिसाळ, राहुल अजय साळवे, तसेच परिसरातील नागरिकांच्या समवेत सदर परिसरात औषध फवारणी करावी अशा आशयाचे पत्र दि. 17 ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त डांगे यांना देण्यात आले होते. या बाबतीत देशस्तंभ न्यूज नेटवर्कने बातमी प्रसिद्ध केली होती. सदर बातमीची व पत्राची महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत निलक्रांती चौक, गौतमनगर परिसरात डासांचा बंदोबस्त करण्यासाठी औषध फवारणी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे