देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 7 ऑक्टोबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 04/10/2026 रोजी रात्री 01.00 वा.सुमारास फिर्यादी सद्दाम अन्वर शेख, वय 30, रा.होळी गल्ली, श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा यांचे रिव्हर पार्क बिल्डींग, श्रीगोंदा येथील साहिल ट्रेडर्स दुकानाची कुलूप लावण्याची पट्टी अज्ञात आरोपीतांनी तोडून दुकानातील 10,05,800/- रू किंमतीचे विविध कंपनीचे सिगारेटचे बॉक्स चोरून नेले.याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 903/2026 बीएनएस कलम 305, 331 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्हयातील मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सुयोग सुपेकर, राहुल द्वारके, प्रताप देवकाते, विशाल तनपुरे, अमृत आढाव व प्रशांत राठोड याचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 05/10/2026 रोजी पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना नमूद गुन्हा हा 1) व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव, रा.तायरा सोसायटी, नानेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे याने त्याचे साथीदारासह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने चाकण, ता.खेड, जि.पुणे येथे जाऊन आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी हे काळेवाडी, पिंपरी चिंचवड परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली.काळेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव, वय 22, रा.तायरा सोसायटी, नानेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे 2) गोविंद लालु रूपवते, वय 21, रा.सद्गुरूनगर, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे 3) पीरप्पा उर्फ सचिन जगन्नाथ येरे, वय 22, रा.सद्गुरूनगर, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे 4) संजय उर्फ पंकज सर्वन वर्मा, वय 20, रा.सद्गुरूनगर, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी नमूद गुन्हा हा त्यांचे साथीदार 5) रूपेश उर्फ दादया भोसले पुर्ण नाव माहित नाही रा.चाकण, ता.खेड, जि.पुणे (फरार) 6) गौरव वारे पुर्ण नाव माहित नाही, रा.चाकण, ता.खेड, जि.पुणे यांचेसह केल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडून 45,000/- रू किं.त्यात चार मोबाईल, 15,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 60,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास केला असता आरोपी व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव याने तो व त्याचा साथीदार गोविंद लालु रूपवते अशांनी दिनांक 28/09/2026 रोजी दौंड, जि.पुणे येथे एका वाहनावरील सिगारेटची पिशवी चोरी केल्याचे सांगीतले.यावरून दौड पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयाची माहिती घेऊन खालील गुन्हा उघडकीस आणला.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 दौंड, जि.पुणे 720/2026 बीएनएस कलम 303 (2)
आरोपीकडे दोन्ही गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव याने चोरी केलेले सिगारेट हे 1) राजेश रामकरन गर्ग, रा.मोहननगर, चिंचवड, पुणे 2) महेश परमानंद भोजवाणी, रा.काळेवाडी, पुणे व 3) संगमेश अमर लासुने, रा.पिंपरी चिंचवड, पुणे अशांना विकल्याची माहिती सांगीतली.पथकाने सिगारेट विकत घेणाऱ्यांना चौकशीकामी नोटीस बजावून त्यांनी पंचासमक्ष हजर केलेले श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गुन्हयातील 10,05,800/- रू किं.त्यात विविध कंपनीच्या सिगारेटचे बॉक्स व दौंड पोलीस स्टेशनच्या गुन्हयातील 1,40,900/- रू किंमतीचे सिगारेट असा एकुण 11,46,700/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा