प्रशासकिय

वय वर्ष १८ पूर्ण तरूणांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन!

अहमदनगर, दि.१६ जुलै (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात १ जानेवारी २०२२ रोजी वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या तरूणांनी फॉर्म नंबर ६ भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बी.एल.ओ) यांच्याकडे जमा करून मतदार नोंदणी प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन अहमदनगरचे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मतदान नोंदणी अर्जासोबत फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड , रेशनकार्ड, घरातील एका व्यक्तीचे मतदान ओळखपत्र यांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमात नवमतदार नोंदणी बरोबर फॉर्म नंबर ७, ८ व ८ अ भरून मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम चालू आहे.
यात स्थलांतरित व मतदार यांदीत दुबार नांव आलेले आहेत. अशा मतदारांनी नमूना नंबर ७ चा फॉर्म भरून दयावेत. मयत मतदारांचे नातेवाईक यांनी फॉर्म नं. ७ भरुन त्यासोबत मृत्युचा दाखला जोडणे आवश्यक आहे. मतदारांचे नांव, वय, लिंग व चुकीचा फोटो मतदार यांदीवर आला असेल तर अशा मतदारांनी नमूना नंबर ८ चा फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांचेकडेस न चुकता जमा करावेत. ज्या मतदारांचे नांव एका मतदार यादीतून दुसऱ्या मतदार यांदीत दाखल करावयाचे असल्यास अशा मतदारांनी नमूना नंबर ८ अ चा फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांचेकडे न चुकता जमा करावेत.

*मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ कार्यक्रम -*
मतदारांमध्ये मतदान व निवडणूकांविषयी जागृती वाढावी. यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’ (Systematic Voter Education and Participation – SVEEP) हा पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत मतदार जागृती मंच, निवडणूक साक्षरता संघाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविदयालयांमध्ये स्थापना करण्यात येत आहेत. औपचारीक शिक्षण व्यवस्थेबाहेरील समुदायातील लोकांमध्ये मतदान जागृतीसाठी चुनाव पाठशाला स्थापन करणे, तसचे दिव्यांग, तृतीयपंथी, देहव्यवसाय करणा-या स्त्रिया यासारख्या वंचित घटकांमध्ये मतदार जागृतीसाठी आवश्यक पूर्व तयारी करण्यासाठी सर्व शासकिय कार्यालयातील आस्थापना प्रमुखांना/ स्वीप समिती सदस्यांना सूचना देण्यात येत आहेत. असे ही सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे