आ. तनपुरे कडून १८ गावांना व्यायाम साहीत्य तरुणांनी मानले तनपुरेंचे आभार

करंजी दि.१५ जुलै (प्रतिनिधी) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने पाथर्डी तालुक्यातील १८ गावांना व्यायाम शाळेचे साहीत्य देण्यात आले. या साहीत्याने शालेय विद्यार्थी तसेच तरुणांनी ना. तनपुरेंचे आभार मानले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व तरुणांना त्यांची शरीर संपदा उत्कृष्ट रहावी तसेच सैन्य व पोलिस मध्ये भरती होण्यासाठी उपयोगी पडेल असे व्यायाम शाळेमध्ये असलेले संपूर्ण साहीत्य किट ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आले. पाथर्डी च्या राहुरी मतदार संघातील ३९ पैकी १८ गावांना त्यामध्ये मांडवे , करंजी , खांडगाव , घाटशिरस जवखेडे-खा. , मोहोज खुर्द , सातवड ,मोहोज बु.,डमाळवाडी , कामत शिंगवे , कौडगाव (निंबोडी) , सोमठाणे खुर्द , तिसगाव , कौडगाव , केशव शिंगवे , वैजुबाभुळगाव , शिराळ ,आदि गावांना हे साहीत्य देण्यात आले आहे. जवळपास बहुतेक गावात व्यायामशाळा साहीत्य तेथील ग्रामपंचायत कडे हे देण्यात आले असल्यामुळे तरुणाना भरपुर वेळ व विनामुल्य व्यायाम करता येणार आहे. हे साहीत्य उपलब्ध करून दिल्या बददल अनेक गावातील तरुणांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया = ना. तनपुरे यांनी व्यायाम साहीत्य दिल्यामुळे आता करंजी घाटात तथा रस्त्यावर व्यायाम करण्याची गरज नाही. या साहित्याचा वापर करून सैन्य दलात भरती होणार आहे – संदिप शिंदे ( दगडवाडी )