जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आरोपी शरणागती तसेच पोलीस व आरोपी पाल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
पोलीस,होमगार्ड,पारधी व इतर समाजातील आरोपींचे पुनर्वसन करण्याचे उद्देशाने त्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने संयुक्त मेळाव्याचे आयोजन!

अहमदनगर( प्रतिनिधी):-डॉ.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक कम्युनिटी पोलिसिंग मिशन अंतर्गत व श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे संकल्पनेतून आरोपी शरणागती तसेच पोलीस व आरोपी पाल्य रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन दि.१०/०७/२०२२ रोजी प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथे करण्यात आले होते.पोलीस,होमगार्ड,पारधी व इतर समाजातील आरोपींचे पुनर्वसन करण्याचे उद्देशाने त्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने देशातील व विदेशातील नामांकित ५७ कंपन्यांशी संपर्क व आवाहन करून संयुक्त रोजगार मेळाव्याच्या आयोजन पेमराज सारडा महाविद्यालयात करण्यात आले होते.
सदर मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला व सदर प्रक्रियेत उमेदवारांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले होते मेळाव्यात उपस्थित देश विदेशातील कंपनीचे प्रतिनिधी यांनी उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता व कागदपत्रांची पडताळणी करून कंपनीमध्ये पात्र उमेदवारांना कामकाज करण्याची संधी दिलेली असून त्यापैकी ४६० उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे व प्रतिनिधी स्वरूपात काही उमेदवारांना मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. सदरील रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोहळ्या वेळी श्री.राजेंद्र भवारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प राजुर अकोले,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बी.जे.शेखर पाटील, प्रमुख पाहुणे पद्मभूषण श्री.अण्णा हजारे व तसेच अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री.शिवाजी शिर्के,श्री.अशोक सोनवणे,श्री.मन्सूर सय्यद,श्री.साहेबराव कोकणे,श्री.उमर सय्यद,श्री.करण नवले,श्री.अशोक झोटींग,श्री.सुशील थोरात,श्री.बाळासाहेब शेटे,श्री.सचिन अग्रवाल,श्री.सागर दुस्सल,श्री.सुनिल भोंगळ,श्री.लेलैश बारगजे,श्री.कुणाल जायकर,श्री.सुधिर लंके,श्री.प्रकाश पाटील,श्री.सुभाष गुंदेचा,श्री.राजेंद्र झोंड,श्री.अनिरुद्ध देवचक्के,श्री.जयंत कुलकर्णी,श्री.विजयसिंह होलम,श्री. मोहनीराज लहाडे,श्री.महेंद्र कुलकर्णी,श्री.अनंत पाटील,श्री.संदिप रोडे,श्री.मनोज आगे,श्री.मिलींद देखणे,श्री.बाबासाहेब जाधव,श्री.बाबासाहेब ढाकणे,श्री.सुभाष चिंधे,श्री.राम नळकांडे,श्री.निशांत दातीर,श्री.विजय सांगळे,श्री.गिरीष रासकर,श्री.रोहित वाळके, श्री.राजेंद्र झंकार काळे,प्रा.किसन चव्हाण,अॅड.अरूण जाधव,साहित्य नामदेवराव भोसले, एकलव्य संघटनेचे श्री.शिवाजी गांगुर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक परिक्षेत्र कम्युनिटी पोलिसिंग मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस स्टेशन मध्ये दखल गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी हे मिळून येत नव्हते अगर फरार झाले होते.असे आरोपी हे तपासाकामी पोलिसांसमोरील कायदेशीर चौकशीत सामोरे न गेल्याने त्याचे होणारे परिणाम व गुन्ह्यात हजर झाल्यास कायद्याचे चौकटीमध्ये राहून गुन्ह्याची सत्यता पडताळून किंवा किरकोळ स्वरूपाचे गुन्हे तडजोड पात्र असल्यास मा.उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जिल्ह्यातील पारधी व इतर समाजातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांना मागील दोन महिन्यापासून आरोपींचे शरणागती करणे बाबत आव्हान करण्यात येत होते.अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने आरोपी शरणागती बाबत केलेल्या आव्हानास आरोपी पारधी व इतर समाजातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठीत नागरिकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन एकूण १५५ आरोपी शरणागती बाबत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी माहिती संकलित केली त्या अनुषंगाने रविवार दि.१७/०७/२०२२ रोजी पोलीस मुख्यालय अहमदनगर येथे डॉ.बी.जे. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली आरोपी शरणागती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते पोलिसांचे आव्हानास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळून एकूण १५५ आरोपींनी कायद्यासमोर आज शरणागती पत्करली आहे.सदरील कार्यक्रमास श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री. सौरभकुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग,श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग,तसेच जिल्ह्यातील इतर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे व प्रभारी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेला आहे.