ब्रेकिंगराजकिय

राज्यातील सत्तांतरा नंतरही शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच 📌 प्रभाग आठच्या सरोदे, प्रभाग पाचच्या शिंदे, प्रभाग दोनच्या पटोळेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

अहमदनगर दि. १८ जुलै (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात नुकतेच अनपेक्षित सत्तानाट्य घडले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार जात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. राजकारणाच्या अलीकडील काळातील कमालीच्या वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सामान्य माणसांमध्ये राजकारणाचे काही खरे राहिले नाही. अशी भावना निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र राज्यातील या सत्तांतरानंतरही नगर शहर काँग्रेसमध्ये मात्र इनकमिंग सुरूच आहे. राजकारणाशी निगडित नसणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात काँग्रेस पक्षाला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक आठमधील राहुल सरोदे, सावेडीच्या प्रभाग क्रमांक पाचमधील चंद्रकांत शिंदे, काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक असणाऱ्या सावेडीच्या प्रभाग क्रमांक दोनमधील संजय पाटोळे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. शिवनेरी या जनसंपर्क कार्यालयात काळे यांच्या हस्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मागील आठवड्यात माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा चक्रनारायण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता सरोदे, शिंदे, पाटोळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, नगरसेवक आसिफ सुलतान, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, निलेशदादा चक्रनारायण, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, भिंगार शहर काँग्रेसचे सागर चाबुकस्वार, नगर ब्लॉक काँग्रेस शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
राहुल सरोदे यांनी फिडा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय विदेशी संस्थेमध्ये समाज विकास अधिकारी म्हणून काम केले आहे. कलकत्त्याच्या कंप्याशन इंटरनॅशनल या संस्थेत समन्वयक या पदाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. या काळातील कार्यासाठी त्यांना समाजभूषण पुरस्कार व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी जिल्हा महिला व बाल कल्याण विभागामध्ये अधीक्षक या पदावर काही काळ काम केले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करत सरोदे आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. किरण काळे यांच्याकडे शहर विकासाचे असणारे व्हिजन आणि सर्वसामान्य माणसासाठी त्यांचे असणारे काम यामुळे आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत शिंदे हे गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सावेडी उपनगरामध्ये सक्रियपणे काम करीत आहेत. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आदी विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संजय पाटोळे यांनी युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत विविध उपक्रमाचे आयोजन केले असून वृक्षारोपण कार्यक्रम, अपंगांना मदत कार्य आदी विविध उपक्रम त्यांनी आजवर राबविले आहेत. शिंदे व पाटोळे आता काँग्रेसमध्ये दाखल झाले असून या माध्यमातून शहरात काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करणार असल्याचे त्यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे