श्रीकांत भालेराव यांची रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड !

मुंबई (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) पक्षाची मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.देशभरातुन आलेल्या पक्षाच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत नुतन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली.सदर बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.मा.राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली तसेच अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्रीकांत भालेराव यांच्यासह २६ प्रमुख पदाधिका-यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.
श्रीकांत भालेराव यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कला सम्राज्ञी पवळा कलामंच,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहु विचारमंच,हिवरगाव पावसा ग्रामपंचायत व सर्व संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांनी श्रीकांत भालेराव यांचे आभिनंदन केले.